शुक्रवार, २१ फेब्रुवारी, २०१४




मी समुद्रकिनारी उभा …
दूरवर फक्त पाणी दिसतंय …
जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत…
अनंत आणि यथावकाश..
एक नाव तरंगतीय, लाटांशी झगडतीय
सुर्य अस्ताला जातोय, कंटाळलेला वाटतोय
मागे झाडे सळसळत, चला निजायला म्हणतायत
पाखरे  परत येतायत, घरट्यांमध्ये सामावतायत
मी तसाच तिथे उभा..
माझ्या मनात अनामिक भीती
या लाटांबद्दल, सूर्याबद्दल, त्या नावेबद्दल
कोण आहे मी ? कोण आहेत हे सर्व ?
सारे प्रश्न अनुत्तरीत…
                      - पंकज